श्री सप्तशृंगी दर्शन एक फलप्राप्ती

... आजच्या विज्ञान युगात दैनंदिन जीवनात व्यस्त असताना मानसिक तणाव, कौटुंबिक समस्या इत्यादींनी मन थकून जाते. शरीरही थकल्यासारखे वाटते आणि जेव्हा या यातनांची जाणीव होते ती कमी करण्यासाठी आदिमाया श्री सप्तशृंगी देवीची आठवण येते व केव्हा एकदा गडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेतो असे भक्तांना होऊन जाते. जीवनातील सुख-दुःखाचे ओझे जगदंबेचे दर्शन घेताना जेव्हा तो तिच्या पायावर डोके ठेऊन मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतो तेव्हा निश्चितच काहितरी मिळाल्याची अनूभूती येते. शरीर हलके होते, मन प्रसन्न होते. मनातील विचारांचे वादळ जाऊन दर्शनाबरोबरच निसर्ग सानिध्याचा पुरेपूर लाभ झाल्याने फलप्राप्ती झाल्याचा अनुभव येतो.

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us